नाशिक : गुजरात राज्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेले कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनावर दगड मारून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात येऊन त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, वसंत ठाकूर, सुचेता बच्छाव, आशा तडवी, बबलू खैरे, उद्धव पवार, मीरा साळवे, गोपाळ जगताप, अण्णा मोरे, रामकिसन चव्हाण, सचिन दीक्षित, साजीद खान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST