शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या यात्रेवरील हल्ला भाजपाच्या गुंडांनीच केला, संजय राऊत यांची जोरदार टीका

By दिनेश पाठक | Updated: January 22, 2024 14:04 IST

एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्ष चोरला. आमची नेमप्लेट चोरली. राष्ट्रवादीतील काही लोकांनी देखील त्यांच्या पक्षाची नेमप्लेट चोरली होती, असे सांगून राऊत यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाला जोरदार टोला हाणला.

नाशिक : आसाम येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियान यात्रेवर केलेला हल्ला हा भाजपामधील गुंडांनीच केला असून हल्ला निषेध करणारा तसेच तानाशाही निर्माण करणारा आहे, अशी घणाघाती टीका, खासदार संजय राऊत यांनी येथे सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत केली. अशा पद्धतीची तानाशाही ठेसण्याचे काम आम्ही नाशिकच्या अधिवेशनातून सुरू करणार आहोत, असे देखील राऊत म्हणाले.

अयोध्या सोहळा हा महत्त्वाचा आहेच. आम्हाला राम मंदिर होत असल्याचा अभिमान आहे, परंतु धार्मिक उत्साहाला राजकीय स्वरूप देणे भाजपाचे काम ही बाब योग्य नाही. देशातील चार शंकराचार्यांनी अयोध्येतील सोहळा घाईघाईने होत असल्याचे सांगून या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे याची आठवण देखील राऊत यांनी करून दिली. पण आम्हाला आता आजच्या श्री प्रभू रामाच्या सोहळ्यात काही राजकारण वगैरे करायचं नाही. प्रभू श्रीराम फक्त भाजपचेच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे आहेत. राम जन्मभूमीत शिवसेनेचा वाघ या थीमखाली आम्ही नाशिक येथील शिवसेना अधिवेशनाच्या ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन आयोजित करीत आहोत, नाशिकनंतर हे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी होतील. 

नागपूरला देखील या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचा अयोध्येचा आंदोलनात काय सहभाग म्हणून विचारतात तर त्यांनी नागपूर येथील प्रदर्शनाचे उद्घाटन करायला यावं. त्यांना देखील आम्ही चित्रांच्या माध्यमातून पुरावे सादर करू, असा टोला देखील राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.

राऊत यांचा फडणवीसनबाबत यू टर्न खासदार संजय राऊत यांनी एक दिवस अगोदर  पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस अयोध्येच्या कारसेवक म्हणून नव्हे तर नागपूरच्या स्टेशनवर फिरायला गेले असावे. आणि नागपूरच्या स्टेशनवरील गर्दीमधील तोच होतो फडणवीस यांनी व्हायरल केला,असा हल्लाबोल केला होता, परंतु दुसऱ्या दिवशी खासदार राऊत यांनी आपल्या या विधानावर घुमजाव केले. देवेंद्र फडणवीस अयोध्येला कारसेवक म्हणून गेले असावे आम्ही कुठे नाही म्हणतो,असे सांगून राऊत यांनी घुमजाव केले. परंतु फडणवीस यांनी अगोदर मीपणा सोडावा. अयोध्या आंदोलनात मी गेलो होतो... मी गेलो होतो असे वारंवार सांगू नये. त्यांचे हे विधान लाखो कारसेवकांचा अवमान असल्याचे राऊत यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना आम्हीच प्रथम अयोध्येला नेले होते, असे देखील राऊत सांगायला विसरले नाही. अजित पवार यांनाही टोला एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्ष चोरला. आमची नेमप्लेट चोरली. राष्ट्रवादीतील काही लोकांनी देखील त्यांच्या पक्षाची नेमप्लेट चोरली होती, असे सांगून राऊत यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाला जोरदार टोला हाणला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत