शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या भरारी पथकांवरच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मद्य तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावालगत घडली आहे.

ठळक मुद्देरॉड, लाठ्या-काठ्यांचा वापर : जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात परराज्यातून होणाऱ्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या भरारी पथकांवरच मंगळवारी पहाटेच्या सुमारास मद्य तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावालगत घडली आहे. यात तस्करांनी हल्ला करताना लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांचा सर्रास वापर केल्याने राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संघटितपणे सशस्त्र हल्ला चढविण्याची ही पहिलीच घटना मानली जात असून, यावरून मद्य तस्करांची मजल कितपत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.नाशिक जिल्ह्यात दीव, दमण, सिल्व्हासा या केंद्रशासित राज्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची तस्करी करून आणली जात आहे. या मद्याची महाराष्टÑात विक्री, वाहतूक व साठवणूक कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्रशासित भागात मद्यावर कुठलीही कर आकारणी होत नसल्याने मद्याच्या किमती स्वस्त आहेत, त्यामुळे त्याची तस्करीकरून चढ्या भावाने त्याची विक्री करणाºया टोळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून वेळोवेळी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करून आजवर कोट्यवधी रुपयांची तस्करी रोखण्यात आली आहे. त्यामुळे मद्य तस्कर संघटित झाले असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मध्यरात्री मद्य तस्कर व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांमध्ये झालेली धुमश्चक्री मानली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सुरेश बाबू शिंदे यांना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास चोरटी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दिंडोरी येथील भरारी पथक याठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले होते. रात्री दीड वाजेच्यास सुमारास एक पिकअप वाहन या पथकाला संशयितरीत्या आढळले. पथकाने चौकशी केली असता पिकअपमधील संशयितांनी गाडी सोडून पोबारा केला.दरम्यान, पथकाने त्यांचा पाठलाग केला असता, मद्य तस्करांनी पुढे एका एक्सयूव्ही कारमध्ये बसून पळ काढला. या कारचा पाठलाग करत असताना रस्त्यावर दोन चारचाकी संशयितरीत्या पथकाला आढळल्या. या वाहनांची चौकशी करण्यासाठी पथक थांबले असता या संशयितांनी भरधाव एक्सयूव्ही वाहनात बसून तिथून पळ काढला. अधिक तपास सुरगाणा पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.मोटारसायकलवरून केला पाठलागसुरगाणा तालुक्यातील उंबरठाणकडे हे पथक येत असताना पथकाचाच पाठलाग तीन मोटारसायकलस्वारांनी केला. पुढे उंबरठाण शहरालगत आल्यानंतर गावात एक स्विफ्ट कार उभी होती. तिथे काही संशयित उभे दिसले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या होत्या, त्यांनी या पथकास कोण आहात अशी विचारणा केली त्यावर पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उल्लेख करताच, मद्य तस्करांनी पथकाच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. काही कळण्याच्या आतच पथकातील अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. या घटनेत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी