नाशिक : घरच्या जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात नाशिक पंचायत समितीच्या उपसभापती सुजाता रुपवते यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार सोमवारी विल्होळी येथे घडला़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी जमिनीच्या वादावरून सुजाता रुपवते व त्यांचे दीर वाघू रुपवते, पुतणे अंकुश व नितीन रुपवते यांच्याशी भांडण झाले़ यामध्ये सुजाता रूपवते यांना दगड विटांनी मारहाण करण्यात आली़ यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे़ मात्र रात्रभर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़
पंचायत समितीच्या उपसभापतींवर हल्ला
By admin | Updated: June 12, 2014 01:03 IST