सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधा यावर मात करण्यासाठी मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केला ग्रुपच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयास वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड अपुरे पडू लागल्याने तातडीने २१ बेड, २०० पीपीई किट आणि २०० एन-९५ मास्क आदी साहित्य भेट देण्यात आले.कोरोनाच्या रूपाने देशावर संकट आले असून, ते परतवून लावण्यासाठी उद्योजकांनी आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी केला यांनी केले. केला ग्रुपचे संस्थापक किशोर केला यांच्या मार्गदर्शनाखाली केला ग्रुपचे सत्या केला, आदर्श जाजू यांच्या हस्ते ही साधनसामग्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. निर्मला पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरनार, डॉ. शशांक पवार यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी केला ग्रुपमधील रामचंद्र नरोटे, मनोज गुंजाळ, अशोक आरखडे, राजेंद्र काळोखे, रमेश पवार, अनिल उकाडे, संतोष दातरंगे, चंद्रकांत अत्रे, सुहास कुलकर्णी, अशोक साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात साधनसामग्रीची वानवा असल्याने मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.घ्यावा आणि आपापल्या परीने मदत करून कोरोना विरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:48 IST