शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नद्या जोड प्रकल्पनिधीची गरजकेंद्राकडून मदत अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:37 IST

नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जलअभ्यासकराजेंद्र जाधव यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासाठी पाणी हवे असेल तर स्वतंत्र महामंडळ स्थापन करा: जलचिंतनचेराजेंद्र जाधव यांचा सल्ला

नाशिक- महाराष्ट्रातील नार- पार सहअन्य पाणी वाहून गुजरात मध्ये जाते. हेपाणी महाराष्ट्राच्या भूमीसाठी वापरायचे असेलतर त्यासाठी मोठा खर्च येणारआहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहेचकुठे, असा प्रश्न जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जलअभ्यासकराजेंद्र जाधव यांनी केला आहे. राज्य सरकारची इच्छा चांगली आहे. मात्र,त्यासाठी एकतर केंद्राकडून निधी मिळावा अन्यथा या प्रकल्पांसाठी स्वतंत्रमहामंडळ स्थापन करून निधी उभारायला हवा, त्यासाठी समृध्दी पॅटर्नवापल्यास उपयुक्त ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात आणि नाशिक लगत पडणारे पावसाचे पाणी वाहून गुजरातकडे जाते.ते वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातीलभाजप सरकारने राज्यातील तत्कालीन भाजप सरकारशी चर्चा करून हे पाणीगुजरातला नेण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी राज्यातील लोकप्रतिनिधी,राजकिय नेते आणि नागरीकांना जागृत करण्यासाठी जाधव यांनी प्रयत्न केलेआहेत. आता अलिकडेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कळमुस्ते प्रवाहीवळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना तसेच उर्ध्व कडवा योजनांची आढावा बैठकघेतली. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्'ातील धरणांचे पाणी महाराष्ट्राच्याजमिनीला देणार असल्याचे घोषीत केले. त्यापार्श्वभूमीवर या पाण्याबाबतच्यायोजनांबाबत जाधव यांच्याशी साधलेला संवाद..प्रश्न-गुजरातकडे नेल्या जाणाऱ्या पाण्याच्या योजनांची सद्य स्थिती कायआणि महाराष्ट्र- गुजरात प्रस्तावित कराराचे पुढे काय झाले?जाधव- गुजरातकडे जाणारे पाणी काही प्रमाणात महाराष्ट्राला देण्याची तयारीकेंद्र शासनाने दाखवली होती. मात्र, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी देण्यासविरोध सुरू झाल्यानंतर सरकारने गुजरातला पाणी देण्याबाबत सकरात्मकतादाखवली नाही. त्यामुळे करार तर थांबलाच परंतु गुजरातला पाणी देण्याच्याबदल्यात महाराष्ट्रातील तील नद्या जोड प्रकल्पासाठी देण्यात येणारी आर्थिक रसददेखील थांबली. खरे तर एखाद्या राज्याला पाणी दिले तरच महाराष्ट्रालाआर्थिक मदत अन्यथा केंद्र सरकार निधी देणार नाही असे  म्हणणे म्हणजेएकप्रकारे दादागिरीच झाली.प्रश्न- गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात वळवायचे असेलतर त्यासाठीयोजनांची कितपत आखणी झाली आहे.जाधव- गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात मराठवाडा आणि खान्देशसाठीवापरल्यास त्यामुळे या भागातील तुट कमी होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळयांनी आढावा घेतलेली कळमुस्ते वळण योजना तसेच अन्य अनेक योजनांंचे डीपीआरतयार होऊ लागले आहेत. नार पारचे पाणी वीजेचा वापर करण्याऐवजी वळण बंधारेबांधून आणणे आणि पाणी लिफ्ट करून आणणे अशा दोन्ही टप्प्यांवर प्रस्तावआहेत. सिन्नर येथील बंधा-यासाठी २७००, नाशिक- दमणगंगा- एकदरेप्रकल्पासाठी ८०५, नारपार - गिरणार लिंक साठी पार कालवा लिंकसाठी २७०कोटी असे प्रस्ताव आहेत. मात्र, त्यासाठी पैसा कुठे आहे. शासनाने खर्चकरण्यासाठी काय करावे याचे नियोजन करण्याची गरज आहे.प्रश्न- इतके मोठे प्रकल्प साकारण्यासाठी निधीची गरज आहेच, परंतु त्यावरव्यवहार्य योजना काय?जाधव- राज्य सरकारने पाण्यासाठी सजगता दाखवली आहे. मात्र, आता निधीसाठीनियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी दोन पर्याय आहे. एकतर शरद पवारयांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला शिष्टमंडळानेभेटण्यास जाऊन सर्व प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधी आणला पाहिजे. अन्यथादुसरा पर्याय निधी उभारणीचा आहे. गेल्या सरकारने नागपूर- मुंबई समृध्दीमार्गाचे काम करण्यासाठी वित्तीय संस्थेकडून अर्थसहाय्य केले आणि हामार्ग कसा होईल यासाठंी अत्यंत जाणिवपूर्वक नियोजन केले.आज राज्यातसत्तांतर झाले तरी समृध्दी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तसे याप्रकल्पांसाठी महामंडळ स्थापन करून एशियन बॅँक किंवा तत्सम संस्थेकडूनवित्तीय सहाय्य मिळवल्यास सर्व प्रकल्प मार्गी लागू शकतील. मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण