येवला : कोरोनोच्या पाशर््वभूमीवर राज्यशासनाला कोटमगाव येथील श्री जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे.अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांनी दिली आहे. धनादेश जमा करताना विश्वस्त रामचंद्र लहरे, भाऊसाहेब आदमने आदींसह विश्वस्त उपस्थित होते. शासनाला आर्थिक मदतीचा हात म्हणून अनेक धार्मिक मंदिर, ट्रस्ट तसेच सामाजिक संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदतही केली जात आहे.
जगदंबा माता ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:37 IST