येवला : तालुक्यातील अंनकाई येथे महसूल दिनाचे औचित्य साधून येथील पुण्यश्लोक आहल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थचे सरचिटणीस डॉ. सुधीर जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांतधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मंडलिक हे होते. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. प्रांतधिकारी वासंती माळी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, तसेच चिमणीच्या घरट्याचे उदाहरण देऊन तिचे प्रयत्न, सातत्याचा व जिद्द, चिकाटी याचा दाखला देऊन आपल्या जीवनात या गोष्टी असतील तर आपणही यशस्वी होऊ शकू तसेच करिअरसंदर्भात मार्गदर्शन केले. तहसीलदार शरद मंडलिक यांनी महा-राजस्व अभियानाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.गाढे सर यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्र मास बाबुलाल कासलीवाल, भीमराज व्यापारे, राजू परदेशी, विद्यालयाचे शिक्षक एस. एच .गायकवाड, डी. जि. परदेशी, ए. एन. पठाण, डी.बी.वैद्य, एम.ए.पवार, बी. के.मुजाळे, श्रीमती सोनवणे उपस्थित होते. यावेळी राज्य पातळीवर खेळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 200 राष्ट्रीयत्व व अधिवास दाखल्याचे वाटप करण्यात आले.
महा-राजस्व अभियान अंतर्गत दाखले वाटप
By admin | Updated: August 3, 2015 00:01 IST