शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मारहाण प्रकरणी बच्चू कडू वसतिगृहात धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:23 IST

मद्यधुंद काळजीवाहकाने अंधशाळेतील चार अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली असून, येत्या दोन दिवसांत ते नाशिकमधील समाजकल्याणच्या अंधशाळेत धडकणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : मद्यधुंद काळजीवाहकाने अंधशाळेतील चार अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली असून, येत्या दोन दिवसांत ते नाशिकमधील समाजकल्याणच्या अंधशाळेत धडकणार असल्याचे वृत्त आहे.  अंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या कर्मचाºयाला अद्यापही ताब्यात घेण्यात आलेले नाहीच शिवाय मारहाण झालेल्या एका विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने बच्चू कडू याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना जाब विचारणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे पाठ फिरविली असताना कडू यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.  नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेला अपंगांवर होणाºया दोन टक्के खर्चाचा जाब आमदार कडू यांनी विचारल्यानंतर संपूर्ण प्रशासन हलले होते. या दोन्ही स्वराज्य संस्थांमध्ये अपंगांवर करण्यात येणाºया खर्चाला कात्री लावण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर कडू यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीना आणि तत्कालीन मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांना चांगलेच धारेवर धरले हाते. कृष्णा यांच्यावर तर कडू यांनी हातही उचलल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता कडू पीडित अंध विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत धडकणार असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  आमदार कडू यांच्या नाशिकमधील काही निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती दिली असून, दोन दिवसात कधीही कडू नाशिकमध्ये दाखल होतील, असे सांगण्यात आले. यावेळी ते अंधशाळेतील पीडित विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून, येथील अधीक्षकांकडूनही ते माहिती घेणार आहेत. अपंगांसाठी कार्य करणाºया प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची माहिती कडू यांना दिल्यानंतर त्यांनी आपण नाशिकमध्ये येत्या दोन दिवसात कधीही येऊ, असे सांगितल्याचे समजते.अक्षम्य दुर्लक्षअंध शाळेतील चार विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार घडल्यानंतर मारहाण करणारा कर्मचारी आपल्या गावी निघून गेला असून, तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सदर बाब उघडकीस आल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने येथील अधीक्षकेला निवेदन देण्यात आल्यानंतर संबंधितावर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही केवळ गुन्हा नोंदविण्याचे सोपस्कार केले, मात्र संबंधित कर्मचाºयाला अटक करण्यात आलेली नाही. नाशिकमधील एकाही लोकप्रतिनिधीने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांती