शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ घरी जाऊन जाब विचारा : मधुकर पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:32 IST

पुण्यातील आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देणारे भाजपा सरकार व या सरकारमध्ये मंत्रिपद भोगणारे समाजाचे नेते यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा,

नाशिक : पुण्यातील आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देणारे भाजपा सरकार व या सरकारमध्ये मंत्रिपद भोगणारे समाजाचे नेते यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा, असा सल्ला माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी (दि़ २५) नाशिकममधील पत्रकार परिषदेत धनगर समाजाला दिला़ आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यास आपला विरोध नसून कार्यालयावरील निंदनीय हल्ल्याचा निषेध व्यक्त करून दोषींवर कारवाईची मागणीही पिचड यांनी यावेळी केली़  पिचड यांनी सांगितले की, गत पन्नास वर्षांपासून आदिवासींसंबंधी काम करणाऱ्या पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गौरविलेले आहे़ शुक्रवारी (दि़ २४) काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी संस्थेच्या कार्यालयात घुसून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली तोडफोड केली़ या संस्थेचे संचालक कै. डॉ़ गोविंद गारे यांनी संस्थेच्या नावारूपासाठी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जमातीची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, राहणीमान, शेती कामाची पद्धत यावर संशोधन केलेले आहे़ या कार्यालयावरील हल्ला हा दुर्दैवी अन् निषेधार्ह असून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे़  भाजपा सरकारच्या कार्यकाळात आदिवासींचा एकही प्रश्न सुटलेला नाही़ सरकारची आदिवासींचे प्रश्न सोडविण्याची पद्धत चुकीची असून, याबाबत गत आठवड्यात आदिवासी समाजाचे सर्व आमदार व खासदार यांनी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन त्यांना आदिवासींच्या प्रश्नांबाबत माहिती दिली़गोंड आणि राजभोर या दोन जातींना केवळ त्यांच्यामध्ये स्वल्पविराम नसल्याने त्यांना सवलत मिळत नव्हती, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागली़ धनगड ही एक देशातील एक जात असून, ती ओडिसा, बिहार झारखंड या राज्यात आहे़ या ठिकाणी टाटांनी सर्वेक्षण केले असून, त्यांचा तो अहवाल प्रलंबित आहे़ धनगरांची वेगळी जात असून, स्पेलिंग मिस्टेक असू शकत नाही तसेच संशोधनातून ते समोर येईल़  आदिवासी विभागातील रिक्त पदे भरण्याबरोबरच, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना डीबीटीची योजना नको असून, सरकारने हा वेडेपणाचा निर्णय बदलण्याची गरज आहे़ धनगरांना आदिवासींमध्ये घालू नये, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने हवे तेवढे, हवे त्यांना आरक्षण द्यावे त्यास विरोध नसल्याचे पिचड यांनी सांगितले़टाटा कंपनी सुरू असलेले सर्वेक्षण आदिवासी समाजाला मान्य नाही़ मुळात टाटा हे धंदेवाईक आहेत, त्यांना काय आदिवासी माहिती? आदिवासींची राहणी, पद्धती याच्या सर्वेक्षणाबाबत काय माहिती आहे ? त्यामुळेच आदिवासींची माहिती असणाºया आदिवासी संशोधन संस्था महाराष्ट्रात, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात येथे असून, महाराष्ट्राच्या संस्थेकडून सर्वेक्षण नको असेल तर गुजरातच्या संस्थेकडून सर्वेक्षणाचे काम करून घ्या, टाटाकडून का? असा सवाल पिचड यांनी विचारला आहे़

टॅग्स :Madhukar Pichadमधुकर पिचडNashikनाशिक