शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या कर्जवसुली स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:09 IST

सायखेडा : दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. या सक्तीच्या कर्जवसुलीला स्थगिती मिळविण्यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घालत निवेदन दिले.

ठळक मुद्दे शेतकरी अस्मानी सुलतानी संकटामुळे आर्थिक विवंचनेत

सायखेडा : दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. या सक्तीच्या कर्जवसुलीला स्थगिती मिळविण्यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घालत निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडल्याने हलाखीत जीवन जगत आहे. अवकाळी पावसामुळेही ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीही जिल्हा बँकेकडून सक्तीने कर्जवसुली मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून वसुलीसाठी स्थगिती न दिल्यास नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात, अशी भीतीही कदम यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे. यावेळी करे यांनी जिल्हा बँकेकडून माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कदम यांना दिले. तसेच निफाड तालुक्यातील चोवीस गावांचा पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सहकार्य केल्याबद्दल अनिल कदम यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी बाजार समिती माजी संचालक गोकुळ गीते, बाळासाहेब सरोदे, अमोल भालेराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक