शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आश्विननगरचा जॉगिंग ट्रॅक हरवला धुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:11 IST

आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सिडको : आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या धुळीचा त्रास होत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर परिसरातील नागरिक जॉगिंगसाठी येतात. आरोग्य चांगले राहावे यासाठी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येथे येतात; परंतू देखभालअभावी ट्रकवर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ट्रॅकच्या लगत असलेल्या भागातही घाण व कचरा साचलेला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ट्रॅकवर म्युझिक सिस्टीम बसविण्यात आली असली तरी ती अनेकदा बंदच असते. ट्रॅकवरील धुळीमुळे येथे येणाºया नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. बंद अवस्थेत असतात, तर काही झाडाझुडपात अडकलेले आहेत. महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, सभापती हर्षा बडगुजर व नगरेसवक राकेश दोंदे, कावेरी घुगे यांनी अधिकाºयांसमवेत ट्रॅकची पाहणी केली. यावेळी जॉगिंग ट्रॅकवर नियमित पाणी मारण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्रकर्मचा-यांनी या आदेशालाही जुमानले नसल्याचे चित्र दिसत आहे.राजे संभाजी क्रीडा संकुलाची संपूर्ण दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असलेला जॉगिंग ट्रॅकवर धुळीचे साम्राज्य पसरल्याने यावरून चालताना धुळीचा त्रास होत आहे. महापालिका अधिकारी तसेच नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे स्टेडिअमचा विकास खुंटला असल्याचा आरोप माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका