मुकणे : मुकणे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नम्रता पॅनल व अष्टविनायक पॅनलचा सरळ अष्टविनायक पॅनलला सात जागांवर विजय मिळाला, तर नम्रता पॅनलला चार जागा मिळाल्या.वॉर्ड क्रमांक २ मधून नम्रता पॅनलचे प्रभाकर आवाटी, योगीता बोराडे, मंदाबाई बोराडे यांनी लढतीतून विजय मिळवला, तर किशोक उबाळे हे प्रभाग क्रमांक ४ मधून आधीच बिनविरोध निवडले होते. प्रभाग क्र. १ मधून अष्टविनायक पॅनलचे हिरामण राव, चंद्रभागा राव, प्रभाग क्र. ३ मधून भास्कर राव, दीपाली चोरडिया, सविता राव, तर प्रभाग क्र. ४ मधून चंद्रभागा साबळे व काळू मुकणे यांनी बाजी मारली.नम्रता पॅनलचे नेतृत्त्व बाजार समितीचे माजी सभापती कचरू पा. शिंदे, काशीनाथ पा. बोराडे यांनी, तर अष्टविनायक पॅनलचे नेतृत्त्व बाजार समिती संचालक विष्णू पा. राव, मदनलाल चोरडिया आदिंसह कार्यकर्त्यांनी केले. दरम्यान, सरपंचपदासाठी आरक्षित जागेवरून अष्टविनायक पॅनलच्या चंद्रभागा साबळे या निवडून आल्याने त्या प्रबळ दावेदार मानल्या जात असून, उपसरपंचपदी अष्टविनायक पॅनलतर्फे कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. (वार्ताहर)