शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 17:59 IST

जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचे वारकऱ्यांचे पांडुरंगाला साकडे

जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात.कधी कधी तर एकादशी होऊन गेली आणि गुरुपौर्णिमेला घरी परतण्याची वेळ आली तरी पाऊस नसतो तेव्हा तो जड पावलांनी माघारी फिरतो, पण वारीत सारखी घरचीच चिंता त्याला असते. यावर्षी पाऊस वेळेवर झाल्याने शेतकºयांनी मृग नक्षत्रात पेरणी केली पण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरीत यावर्षी महाराष्ट्रात कोरोना संसर्ग साथीच्या थैमानाने वारकºयांना पंढरीला जाता आले नाही. मृग नक्षत्रात पावसावर पेरण्या केल्या पण त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकºयाची चिंता वाढतच गेली, पण पावसाने मात्र शेतकरी सुखावला असल्याने वारीला जाता आलं नाही तरी वारकरी मात्र विठूनामाच्या भक्तीत शेतीत हातभार लावत होता आणि पावसासाठी आतुरतेने पांडुरंगाचे नामस्मरण करीत आभाळाकडे बघत होता, सोमवारी नक्षत्र बदलले आणि वातावरणात बदल होऊन जोड नक्षत्रावर पाऊस २५ ते २७ जून सर्वत्र बरसला आणि सुकू लागलेली पिके टवकारली, पिकास जीवदान मिळाले, सर्व शेतकरी पुन्हा एकदा आपल्या श्रद्धेच्या सागरात पांडुरंगाच्या भक्तिरसात अथांग डुबला. तसेच महाराष्ट्राला कोरोनातून मुक्त करण्याचं साकडं पांडुरंग चरणी वारकºयांनी घातलं.प्रत्येक वारकºयाला वाटते की आषाढी-कार्तिकीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे, परंतु कोरोना साथीच्या आजाराने पांडुरंगाला विसरावे लागले, शरीराने पांडुरंगाला भेटता आले नाही पण मनाने, अंत:करणाने पांडुरंगाचे दर्शन करू शकलो, पांडुरंगाच्या कृपेने चांगला पाऊस झाला आणि पिके धरू लागली आहेत. तसेच कोरोनाच्या साथीतून मुक्त करण्याचे पांडुरंगाला साकडे घातले आहे.- श्याम महाराज ठोंबरे, पुरणगाव. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी