शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

असहाब-ए-रसूल बाबा दर्गा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उरूसामध्ये घडणार दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 16:07 IST

विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते.

ठळक मुद्देउरूसाचा समारोप गुरूवारी सायंकाळीमहामंडळाच्या बसेसच्या फे-या सुरू राहणार उरूसानिमित्त दर्गा परिसरात जय्यत तयारी

नाशिक : संगमनेर, सिन्नर तालुक्यांच्या वेशीवर असलेल्या हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान हजरत असहाब-ए-रसूल बाबा दर्ग्यावर येत्या तीसऱ्या श्रावणी गरूवारनिमित्त (दि.१५)उरूस आयोजित करण्यात आला आहे. या एकदिवसीय वार्षिक यात्रोत्सवासाठी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यानिमित्त राज्य परिवहन महामंडळ संगमनेर आगाराने विशेष जादा बसेसची व्यवस्था केली असल्याची माहिती दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.असहाब-ए-रसूल बाबा यांचा दर्गा पारेगावच्या हद्दीत आहे. नांदूरशिंगोटे येथून निमोणमार्गे तसेच वावीमार्गे बाबांच्या दर्ग्यावर पोहचता येते. सालाबादप्रमाणे यंदाही निमोण येथील भाविकांकडून पारंपरिक प्रथेप्रमाणे संदलची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात येणार आहे. मिरवणूकीला सकाळी नऊ वाजता या गावातील सुन्नी नुराणी मशिदीपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. उरूसाचा समारोप गुरूवारी सायंकाळी करण्यात येतो. या एकदिवसीय यात्रेकरिता निमोण, वावी या दोन्ही गावांमधून थेट दर्ग्यापर्यंत दर अर्ध्या तासाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फे-या सुरू राहणार असल्याची माहिती दर्ग्याच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे. नांदूरशिंगोटे येथून सावर्जनिक वाहतूकीच्या साधनांनी थेट निमोण व वावीपर्यंत पोहचता येते. बाबांच्या उरूसासाठी नाशिक शहर, सिन्नर, संगमनेर तालुक्यासह श्रीरामपूर तालुक्यामधील विविध गावांमधूनदेखील भाविक हजेरी लावतात.दरम्यान, उरूसानिमित्त दर्गा परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था मुबलकप्रमाणात केल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे. तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते.

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीमAhmednagarअहमदनगर