लासलगाव : कोटमगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा कैलास भिलोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.१० सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत मागील उपसरपंचांनी आवर्तन पध्दतीनुसार राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे ही निवड प्रक्रीया पार पडली. यावेळी कोटमगाव ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, मंगला काळे, भाऊसाहेब पवार, भाऊसाहेब पवार, रामिसंग कडाळे, सागर खैरनार, आशा शिरसाट, मनीषा काळे, इंदुबाई गांगुर्डे, ग्रामसेवक अजय आव्हाड आदींचा सहभाग होता. नविनयुक्त उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी उपसरपंच प्रमोद पवार, वसंत पवार, नंदू राम सुपेकर, मधुकर भिलोरे, तुकाराम भिलोरे, निलेश शिरसाठ, कैलास शिरसाट, जितेंद्र भिलोरे, कैलास शिरसाट, मुकुंद काळे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.(फोटो १६ कोटमगाव)
कोटमगाव उपसरपंचपदी आशा भिलोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 18:41 IST
लासलगाव : कोटमगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा कैलास भिलोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कोटमगाव उपसरपंचपदी आशा भिलोरे
ठळक मुद्देआवर्तन पध्दतीनुसार राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते.