शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

वेदनेतूनच कलाकाराचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:48 IST

रंगकर्मींचा जन्म वेदनेतून होत असून, अशा इतिहासातील थोर रंगकर्मींमुळे आजची रंगभूमी बहरत असल्याचे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष गायिका कीर्ती शिलेदार यांनी केले. दादासाहेबांच्या तालमीत तयार होत असताना एका नाटकाच्या प्रसंगी मुखवट्याच्या आत विंचवाचा डंख सहन करून रंगभूमीवर कलाविष्कार सादर करणाऱ्या वसंत शिंदेंचे उदाहरण देताना खºया रंगकर्मींचा जन्म वेदनेतूनच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देकीर्ती शिलेदार : नाट्य परिषद नाशिक शाखेच्या पुरस्कारांचे वितरण

नाशिक : रंगकर्मींचा जन्म वेदनेतून होत असून, अशा इतिहासातील थोर रंगकर्मींमुळे आजची रंगभूमी बहरत असल्याचे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष गायिका कीर्ती शिलेदार यांनी केले. दादासाहेबांच्या तालमीत तयार होत असताना एका नाटकाच्या प्रसंगी मुखवट्याच्या आत विंचवाचा डंख सहन करून रंगभूमीवर कलाविष्कार सादर करणाऱ्या वसंत शिंदेंचे उदाहरण देताना खºया रंगकर्मींचा जन्म वेदनेतूनच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.महाकवी कालिदास कलामंदिर येथे (दि. ०७) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी (दि. ७) मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांना दिल्या जाणाºया पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘रंगभूमी दिन २०१८’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, केंद्रीय डोमेन एक्सपर्ट कमिटीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, रंगकर्मी सचिन शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी नांदी सादर झाल्यानंतर लेखक प्रशांत दळवी यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्या वतीने दिलीप जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार व आमदार हेमंत टकले यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोकमतचे सुनील भास्कर यांना सांस्कृतिक पत्रकारिता पुरस्कारमराठी रंगभूमी पुरस्कारांमध्ये लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक सुनील भास्कर यांना सांस्कृतिक पत्रकारितेसाठी जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकच्या उद्योन्मुख कलाकारांचा परिचय रसिकांना करून देत नवकलाकारांना नाट्यक्षेत्रातील मार्गदर्शनपर पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावेळी विजय साळवे यांना दत्ता भट अभिनय (पुरुष), नंदा रायते यांना शांता जोग अभिनय (स्त्री), सुनील देशपांडे यांना प्रभाकर पाटणकर दिग्दर्शन, मुरलीधर तांबट यांना गिरीधर मोरे प्रकाश योजना, आनंद बापट यांना रावसाहेब अंधारे नेपथ्य, सुगंधा शुक्ल यांना वा. श्री. पुरोहित बालरंगभूमी, प्रकाश नन्नावरे यांना रामदास बरकले लोककलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कुटुंबीयांचा सन्मानमराठी रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिवंगत रंगकर्मींच्या कुटुंबीयांनाही सन्मानित करण्यात आले. यात दिवंगत सूर्यकांत देशपांडे, रघुनाथ साळवे, रमेश रोकडे, हरून बागवान, पद्माकर बेळगावकर, सुनील रत्नपारखी, विकास जाधव, मंगेश लोखंडे यांच्या कटुंबीयांना मानपत्र व स्मृतिदीप देऊन सन्मानित करण्यात आले.विशेष योगदान पुरस्कारअखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिख शाकेतर्फे आरोग्य सेवेत विशेष योगदान देणाºया डॉक्टरांनाही सन्मानित करण्यात आले. यात डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह डॉ. राजेश अहेर, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. राजीव पाठक यांना स्मृतिचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक