शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तोफखाना केंद्राचा शपथविधी : ३०२ नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 14:11 IST

नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन केले.

ठळक मुद्देतोफांच्या साक्षीने 'सॅल्युट'भारतीय सेनेची परंपरा राखा; सैनिकी धर्म पाळानवसैनिकांच्या माता-पित्यांना गौरव पदक

नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथून सुमारे ३०२ नवसैनिक (तोपची) भारतीय सैन्यदलात दाखल झाले. शनिवारी (दि.१३) कोरोनाच्या सावटाखाली येथील उमराव मैदानावर दिमाखदार दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी नवसैनिकांच्या तुकडीने शानदार संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला.

भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या सामान्य कुटुंबातील युवक ४२ आठवड्यांपुर्वी नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झाले. अत्यंत खडतर अशा लष्करी प्रशिक्षणाने या युवकांना एक परिपुर्ण सैनिकाच्या रुपात घडविले. या नवसैनिकांनी देशाच्या सर्वात मोठ्या अशा तोफखाना प्रशिक्षण केंद्रात सर्व प्रकारचे धडे गिरवून स्वत:ला देशसेवेसाठी सज्ज केले. केंद्रातील उमराव मैदानावर या तुकडीचा शानदार लष्करी थाटात दीक्षांत सोहळा पार पडला.यावेळी तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया यांनी परेड संचलनाचे निरीक्षण करत नवसैनिकांचा गौरव केला. शपथविधीसाठी होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा मैदानावर आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून शंकाथली गोपिनाथ यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दरम्यान, यावेळी नवसैनिकांच्या माता-पित्यांना यावेळी ब्रिगेडियर गोराया यांच्या हस्ते गौरव पदक समारंभपूर्वक सन्मानाने प्रदान करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धूनने लक्ष वेधून घेत सोहळ्याचे आकर्षण वाढविले. दरवर्षी या तोफखान्यातून शेकडो नवसैनिक ह्यतोपचीह्णच्या भूमिकेत भारतीय सैन्यदलात दाखल होतात.नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भारतीय सेनेची परंपरा राखा; सैनिकी धर्म पाळानवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन केले. नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवसैनिकांनी नेहमीच ह्यसैनिकह्ण धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असे आवाहन केले.

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक