शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लेख टंडन यांना जीवनगौरव

By admin | Updated: March 25, 2017 00:37 IST

नाशिक : नाशिकमधील कलावंतांनी चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला असून, मुंबईपेक्षा नाशिकचे वातावरण चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी अनुकूल आहे

नाशिक : नाशिकमधील कलावंतांनी चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला असून, मुंबईपेक्षा नाशिकचे वातावरण चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. तसेच भविष्यात नाशिक शहर आणि सभोवतालचा परिसर ‘शूटिंग हब’ बनू शकते असा विश्वास रावसाहेब थोरात सभागृह येथे सुरू असलेल्या नवव्या नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये (निफ) विविध मान्यवरांनी व्यक्त केला.निफच्या उद्घाटनप्रसंगी चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक लेख टंडन यांना जीवनगौरव पुरस्कारने, तर किशोरी शहाणे यांना ‘निफ’ सन्मानाने गौरविण्यात आले. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक लेख टंडन आणि निम्मी यांना जाहीर करण्यात आला होता परंतु निम्मी या पुरस्कार सोहळ्यास अनुपस्थित होत्या. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव-बेटी पढाओ आणि महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर यावर्षीच्या निफ फेस्टिव्हलची रचना करण्यात आली आहे. निफ फेस्टिव्हलचे आयोजक मुकेश कणेरी यांनी या महोत्सवासाठी ३० देशांतून प्रतिनिधी आले असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. मुंबईतील वातावरण पूर्णत: व्यावसायिक असल्याने नाशिक हे भविष्यात शूटिंग हब म्हणून पुढे येऊ शकते असा विश्वास कणेरी यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये स्क्रिनिंग सुविधा निर्माण व्हावी अशी खंतही कणेरी यांनी यावेळी बोलून दाखविली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महापौर रंजना भानसी यांनी फाळके स्मारक येथे चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.  या कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आयोजक मुकेश कणेरी, ज्येष्ठ अभिनेते रणजीत, माजी मंत्री बबन घोलप, अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रभावती कणेरी, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक हिमगौरी आडके, चित्रपट निर्माते सतीश राय, रवि बारटक्के, कथालेखक दिलीप शुक्ल, दिग्दर्शक बलराज वीज, श्याम लोंढे, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)