शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीला ११ महिन्यांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:01 IST

म्हसरूळ बोरगड (एकतानगर) परिसरात राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खून प्रकरणात तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयिताला पंचवटी पोलीस ठाण्याच्या पुन्हा शोध पथकाने अकरा महिन्यांनी अटक केली आहे. प्रशांत अशोक जाधव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्देपंचवटी पोलीस : आर्थिक वादातून हत्या

पंचवटी : म्हसरूळ बोरगड (एकतानगर) परिसरात राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खून प्रकरणात तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयिताला पंचवटी पोलीस ठाण्याच्या पुन्हा शोध पथकाने अकरा महिन्यांनी अटक केली आहे. प्रशांत अशोक जाधव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.संशयित जाधव हा पेठरोडवरील मेहरधाम येथे राहत्या घरात असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हा शोध पथकाच्या पोलीस कर्मचाºयांनी जाधव याच्या घराजवळ सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या व म्हसरूळ पोलिसांच्या स्वाधीन केले. जाधव याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.बोरगड येथील नितीन परदेशी याच्यावर गेल्यावर्षी ६ जूनला सतीआसरा मंदिराजवळ संशयित आरोपी विजयकुमार पुंडलिक गांगोडे, मयूर राजाभाऊ जाधव तसेच हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार व प्रशांत अशोक जाधव अशा चौघांनी आर्थिक वादातून परदेशीवर गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. संशयित मयूर जाधव याची चारचाकी परदेशी याने भुसावळला नेली होती त्यावेळी चारचाकीचा अपघात झाल्याने तसेच पोलीस ठाण्यात जमा असलेली गाडी सोडविण्यासाठी जाधव व परदेशी यांच्यात वाद निर्माण झाले होते व त्यातूनच परदेशी याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती तर जाधव हा फरार झालेला होता. त्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र जाधव वेगवेगळ्या जिल्ह्यात वास्तव्य करून पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. जाधव हा मेहरधाम येथील घरी असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर, हवालदार बाळा ठाकरे, सुरेश नरवडे, संदीप शेळके, संतोष काकड, महेश साळुंके, अरुण गायकवाड, विष्णू जाधव, उत्तम खरपडे आदींनी सापळा रचून अटक केली.गुन्हेगारांचे कम बॅकविविध गुन्ह्यांत सहभाग असलेले तर काही गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या संशयित आरोपींचा पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावर वाढला आहे. कधी तडीपार प्रकरणात तर कधी मारहाण व अन्य गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात फरार असलेले गुन्हेगार कागदोपत्री फरार असले तरी ते चोरीछुप्या पद्धतीने राहत असलेल्या परिसरात येत असल्याने गुन्हेगारांचे पुन्हा कम बॅक होत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी