नाशिक : जिल्हा सत्र न्यायालयाचा आवार सुरक्षित करण्याच्या हेतूने न्यायालयाच्या आवारात विनाकारण कायदासुव्यवस्थेला तडा देण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी दुसºया दिवशी गुरुवारी (दि.११) सुरूच ठेवली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी २९ संशयितांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन दिवसांत ७९ संशयितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशान्वये जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादी, साक्षीदारांना दमदाटी करण्याच्या इराद्याने न्यायालयात आलेल्या संशयितांना ‘खाकी’चा हिसका पोलिसांनी दाखविण्यास सुरुवात केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथक, दंगल नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्सच्या मदतीने सहायक आयुक्त बापू बांगर यांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, काही सराईत गुन्हेगारही पोलिसांच्या हाती लागले आहेत.जिल्हा न्यायालयाच्या आवारात धावपळजिल्हा न्यायालयात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा वावर वाढल्याने तसेच तारखेसाठी फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. व्यावसायिक जामिनदारही पोलिसांच्या रडारवर असून न्यायालयात छायाचित्र बदलून जामीन मिळविण्याचा प्रयत्न करणाºयांनाही या मोहिमेने हादरा दिला आहे. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास न्यायालयात पोलिसांचा फौजफाटा दाखल होताच संशयितांची धावपळ उडाली.
संशयितांची धरपकड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:16 IST
जिल्हा सत्र न्यायालयाचा आवार सुरक्षित करण्याच्या हेतूने न्यायालयाच्या आवारात विनाकारण कायदासुव्यवस्थेला तडा देण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या संशयितांची धरपकड पोलिसांनी दुसºया दिवशी गुरुवारी (दि.११) सुरूच ठेवली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी २९ संशयितांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन दिवसांत ७९ संशयितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
संशयितांची धरपकड सुरूच
ठळक मुद्दे७९ व्यक्तींवर कारवाई : जामिनदार पोलिसांच्या रडारवर