शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाºया कार्यकर्त्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:39 IST

नांदूर गावातील किराणा दुकानदाराने केलेल्या इमारतीच्या अतिरिक्त बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया नांदूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाºयास आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) रंगेहाथ पकडले़ या दोघा संशयितांकडून पोलिसांनी एक लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

पंचवटी : नांदूर गावातील किराणा दुकानदाराने केलेल्या इमारतीच्या अतिरिक्त बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया नांदूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाºयास आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) रंगेहाथ पकडले़ या दोघा संशयितांकडून पोलिसांनी एक लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदूर गावातील रहिवासी शिवाजी निमसे हे किराणा दुकानदार असून, त्यांनी इमारतीचे अतिरिक्त बांधकाम केले आहे़ याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता संशयित राजू मधुकर करंडे (३७) याने महापालिकेत अतिरिक्त बांधकामाबाबत तक्रार अर्ज केला होता़ यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार निमसे यांना फोन करून पैशांची मागणी करीत होता. यानंतर मध्यस्थी असलेला त्याचा सहकारी सचिन काशीनाथ धाकतोडे याच्या माध्यमातून पाच लाख रुपयांमध्ये हे प्रकरण मिटविण्याचे ठरले.  किराणा दुकानदार निमसे यांना अतिरिक्त बांधकामाबाबत ब्लॅकमेल करून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया या दोघांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार केलेली होती. त्यानुसार आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सापळा रचला़ नांदूर शिवारातील एका लॉन्सजवळ निमसे यांच्याकडून संशयित करंडे व धाकतोडे यांनी एक लाख २९ हजार रुपयांची खंडणी घेताच गुन्हे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर शिंदे, हवालदार लक्ष्मण बोराडे, दशरथ पागी, विनोद लखन, दिनकर भुसारे यांनी रंगेहाथ पकडले़एकीकडे उपोषण... दुसरीकडे खंडणीनिमसे यांच्या अतिरिक्त बांधकामाची महापालिकेत तक्रार करणारा संशयित माहिती अधिकार कार्यकर्ता राजू करंडे हा २६ जानेवारीपासून आमरण उपोषणासाठी बसणार होता़ एकीकडे उपोषण तर दुसरीकडे खंडणीची मागणी करणाºया करंडेचा दुटप्पीपणा यामुळे समोर आला आहे़ माहिती अधिकारातून ब्लॅकमेलिंग?किराणा व्यवसाय करणाºया निमसे यांच्या अतिरिक्त इमारत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी करंडे याने पाच लाख रुपयांची मागणी केली़ पोलिसांनी त्याच्याकडून काही कागदपत्रे जप्त केली असून, त्यात अनेकांची माहिती अधिकारात माहिती मागितली आहे़ त्यामुळे करंडे हा माहिती अधिकारातून माहिती मागवून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcrimeगुन्हे