शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागणाऱ्या मनपाच्या कर्मचाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:52 IST

मंदिरासमोरील जागेच्या स्वच्छतेसाठी ६०० रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेणाºया नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१८) सापळा रचून रंगेहाथ पकडले़ धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे लाचखोर मिस्तरीचे नाव आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : मंदिरासमोरील जागेच्या स्वच्छतेसाठी ६०० रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम घेणाºया नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़१८) सापळा रचून रंगेहाथ पकडले़ धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे लाचखोर मिस्तरीचे नाव आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील स्वामी लक्ष्मीनंद महाराज मंदिरासमोर दगड आणि मातीचे ढीग होते. त्यामुळे मंदिरासमोरील परिसराची स्वच्छता करावी, असा अर्ज तक्रारदाराने नाशिकरोड विभागीय कार्यालयात केला होता़यावर संशयित धनंजय थोरभिसे याने तक्रारदारास स्वच्छता करून देण्याच्या मोबदल्यात सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तडजोडीअंती सहाशे रूपये मागितले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर याची शहानिशा करून सापळा रचला होता. नाशिकरोड विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेड कार्यालयात सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाच घेताना थोरभिसे यास रंगेहाथ पकडण्यात आले़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग