शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणा-या गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:26 IST

इंदिरानगर : जबरी चोरी करून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना अटकाव केला असता गुन्हे शोधक पथकाच्या कर्मचाºयावर हल्ला करणाºया चारही सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे .तसेच त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुन्हे शोधक पथकाच्या कर्मचा-यावर दगडफेकचारही गुन्हेगार सराईत

इंदिरानगर : जबरी चोरी करून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना अटकाव केला असता गुन्हे शोधक पथकाच्या कर्मचा-यावर हल्ला करणा-या चारही सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे .तसेच त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्र वारी (दि.१३) सकाळी सात वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण बागले, गुन्हे शोधक पथकाचे रियाज शेख, राजेश निकम, भगवान शिंदे, दीपक पाटील गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातून वडाळा गाव येथील मदिना लॉन्ससमोर रस्त्यालगत लावण्यात आलेल्य अ‍ॅम्बुलन्स ची पुढील काच रिक्षा क्र मांक एम एच १५ झेड ५२७५ यातील तीन ते चार इसमांनी दगड मारून फोडली आहे, असे कळविण्यात आले. पथक शोध घेऊ लागल्यावर गॅस गोडाऊनसमोर वडाळा ते डीजीपीनगर कडे जाणाºया जॉगिंग ट्रॅकच्या चौफुलीवर अ‍ॅम्ब्युलन्स क्र मांक एमएच १५ पीएफ ०३९० दिसली. त्याच वेळी रात्रपाळी गस्त असलेले बीट मार्शल पाठक यांनी उभ्या असलेल्या चारचाकीतील दोन व्यक्तींना रिक्षातून आलेल्या चार जणांनी मारहाण करून लुटल्याचे सांगितले. पोलिसांनी गावात फिरून संशियत आरोपीचा शोध सुरु केला .म्हाडा कॉलनीच्या पाठीमागे संशियत रिक्षा दिसून आली. तसेच गावात बुरहान शाकिर शेख, साहील नवाज सैयद , वडाळागाव सलीम युसुफ शेख , तैयब बबलु पठाण फिरत असल्याचे समजले. या संशियतांचा शोध घेत असताना साहिल सय्यद व व सलीम शेख हे दोघे अलिशान सोसायटीच्या परिसरातून लपून-छपून जाताना आढळून आले. त्यांना पोलिसांचा सुगावा लागतात एका बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गुन्हे शोध पथकाने चारी बाजूंनी घेराव टाकून पकडण्याचा प्रयत्न केला असता साहिल सय्यद यांनी पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांच्या कानशिलावर फटका मारला. तर सलीम शेख याने दगड उचलून पथकाच्या दिशेने मारला. तसेच बुरहान शेख व तैयब पठान या दोघांनीही पोलीस पथकावर दगडफेक करून शिवीगाळ केली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे .

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी