शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी दगडफेकप्रकरणी धरपकड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:35 IST

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजकीय नेत्यांचा सहभाग : २२ संशयितांना उद्यापर्यंत कोठडी

मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत्र सुरू केले असून शहर पोलीस ठाण्याने ३०, तर आयेशानगर पोलीस ठाण्याने ३ अशा ३३ संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी २२ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.रविवारी (दि.१४) रात्री माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे पदाधिकारी साबीर गोहर यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. या अटकसत्रामुळे दगडफेक करणाऱ्या संशयित आरोपींचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी रविवारी रात्री आवामी पार्टीचे मो. रिजवान बॅटरीवाला, शेख नासीर शेख महेबूब, माजी नगरसेवक रहेमान शाह, काँग्रेसचे साबीर गोहर, वसीम अख्तर मो. सलीम, अल्ताफ अन्वर शाह, मो. जाहीद अनिस अहमद कच्छी, मो. इम्रान अनिस अहमद, सराईत गुन्हेगार सरफराज, शेख जावीद, शेख इम्रान शेख सलीम, काँग्रेसचे साबीर गोहर यांना अटक करण्यात आली आहे, तर शनिवारी अटक केलेल्या मोहंमद इम्रान मोहंमद उस्मान, आसिफ शेख करीम, मोहंमद रमजान अब्दुल रहीम, मोहंमद हारुण हबीबुररहेमान अन्सारी, फैसल अहमद शकील अहमद, मोहंमद आसीफ मोहंमद युसुफ, तौसीफखान नुरखान, समसुद्दीन अन्सारी, शहेबाज अहमद जलील अहमद, मोईन अनिस, मोइनुद्दीन अब्दुल कादीर, रमजान खान शाहीद खान, आफताब एजाज बेग, शेख अलीम शेख सलीम, आसीफ अहमद निहाल अहमद, अरबाज शेख सरदार, आफताब आलम यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या १७ जणांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुख्य सूत्रधाराच्या शोधार्थ पथकेपोलीस यंत्रणेने दंगल व दगडफेक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या अटकसत्रामुळे पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव वाढू लागला आहे. अटकेतील संशयित आरोपी हे मुस्लिम संघटना व राजकीय पक्षांशी संबंधित असल्यामुळे पोलीस यंत्रणेची कोंडी झाली आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक होऊ नये म्हणून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliceपोलिस