शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत स्थलांतरित ५५ जणांची निवारागृहात व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : भोजन, राहण्याची सोय; मूलभूत सुविधा पुरविणार

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लॉकडाउन व संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक बांधकाम, दुकाने आणि कारखाने बंद पडले आहेत. यामुळे परप्रांतीय व परजिल्ह्यातील कामगार स्थलांतरित होताना दिसत आहेत. बस, खासगी वाहने आणि रेल्वे बंद असल्याने शेकडो कामगार रस्त्याने कुटुंबासह महिला व अबालवृद्धांना घेऊन जाताना दिसत आहेत. तहसीलदार राहुल कोताडे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक रणजित लांडगे यांनी जागेची पाहणी करून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तहसीलदार राहुल कोताडे यांनी या ठिकाणी शिधा पोहोचकेला आहे. कामगारांनी या ठिकाणी थांबण्याचे आवाहन तहसीलदार कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत लांडगे यांनी केले आहे. दरम्यान, गुरु वारी दुपारी दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी निवारागृहात असणार्या स्थलांतरित कामगारांची तपासणी केली.विभागीय आयुक्तांकडून तपासणीनाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी व निवारागृह उभारण्यात आले आहे. मंगळवारी रात्री अचानक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच त्यांनी नाशिकपासून अहमदनगर जिल्ह्यातील बोटा हद्दीपर्यंत असणार्या चेकपोस्टची तपासणी करून सूचना दिल्या. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधीत लोकांना मुलभुत सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. तसेच नाशिक-पुणे, सिन्नर -शिर्डी व सिन्नर -घोटी मार्गावर पायी जाणार्या स्थलांतरित मजुरांना व कामगारांना या ठिकाणी थांबून आधार दिला जाणार आहे. या कामगारांच्या भोजनासह राहण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे, त्यांना आंघोळ, जेवण, स्वच्छता आणि तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. सिन्नर येथील एका मंगल कार्यालयात तर नांदूरशिंगोटे येथे पुणे महामार्गावर संदीप हॉटेलजवळ आणि वावी येथे शिर्डी महामार्गावर साई मनोहर सांस्कृतिक भवन येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य