शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायडोंगरी निवडणुकीत सेनेची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:00 IST

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सर्वात राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडल्याने निवडणुकीत पक्षाची कसोटी लागणार आहे तर तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देगटबाजी : ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढत होण्याची चिन्हे

सहा वॉर्डमध्ये १७ सदस्य असलेल्या या निवडणुकीत ९ हजारच्या पुढे मतदार आहेत. २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत ७० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती विलास आहेर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधले तर शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत मोरे यांनी बंडखोरी केल्याने येथे शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करणे आमदार सुहास कांदे यांच्या समोर मोठे आव्हान होऊन बसले आहे.न्यायडोंगरी माजी आमदार अनिल आहेर यांचा गड म्हणून ओळखला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेला पहिला पराभव आहेरांचा जिव्हारी लागला होता. या वेळेस आपला गड मिळविण्यात ते किती कसब वापरतात, याकडे सर्वांची नजर आहे. आमदार सुहास कांदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विलास आहेर यांच्याकडे शिवसेना पॅनलचे नेतृत्व राहील, तर शशिकांत मोरे यांच्या स्वतंत्र पॅनल चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे झाले तर न्यायडोंगरीत तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर चुरस वाढणार!माजी सरपंच संजय आहेर व वैशाली चव्हाण यांनी दोन वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपली उमेदवारी राखण्यात यश मिळवतील काय, याकडेही लक्ष लागून असणार आहे. माजी आमदार अनिल आहेर, माजी सभापती विलास आहेर, शशिकांत मोरे हे तिन्ही नेते निवडणुकीसाठी सरसावले आहेत. निवडणूक पक्षीय पातळीवर झाल्यास चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत