शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:36 IST

कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.

नाशिक : कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ विचारवंत तथा लेखक डॉ.अण्णासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले.मविप्रच्या व बळीराजा गौरव समिती नााशिक यांच्यातर्फे होरायझन अकॅडमीच्या सभागृहात रविवारी (दि.२०) डॉ. आ. ह. साळुंके यांचा अमृत महोत्सवानिमित्त बळीराजा सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यासह प्रा. उल्हास पाटील, प्रा. अर्जून कोेकाटे, प्रा. अर्जून जाधव, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, नगरसेवक स्वाती भामरे, मविप्रचे संचालक सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. डॉ. आण्णासाहेब साळुंके म्हणाले, भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती असून येथील शेतीला ५ ते ६ हजार वर्षांचा इतिहास आहे. अशी विकसित परंपरा लाभलेल्या कृषिप्रधान देशातच आज लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे असताना आपण तटस्थ राहणे योग्य आहे का? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे परखड मत डॉ. साळुंके यानी व्यक्त केले. प्रास्ताविक गोपाळ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. प्रा. अर्जून कोकाटे यांनी आभार मानले. शेतकºयांसमोरी समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे असून, हवामान बदलामुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक