शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:42 IST

शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे.

नाशिक : शहरातील काही नामांकित शाळांकडून दहावीचा निकाल उंचावण्यासाठी नववीच्या वर्गातील अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. त्यामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांना नववीचा निकाल व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाला  सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने अशा शाळांना आता  चाप बसणार आहे. शिक्षण विभागाने या माध्यमातून केवळ निकाल नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढविण्यासाठी संबंधित शाळांचे कान टोचले असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहे.शिक्षण विभागाने आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करू नये, असे सरकारी धोरण आहे. त्यामुळे आठवीपर्यंत उत्तीर्ण होणारे काही विद्यार्थी नववीच्या वर्गात अडखळतात, तर अनेक विद्यार्थी नववी उत्तीर्ण होण्याची क्षमता असतानाही केवळ दहावीच्या वर्गात कमी गुण मिळवतील अथवा अनुत्तीर्ण होतील या शक्यतेने अनेक विद्यार्थ्यांना नववीच्या परीक्षेतच अनुत्तीर्ण केले जातो.दहावीच्या वर्गातील कामगरी उत्तम दिसावी, यासाठी शहरातील वेगवेगळ्या नामांकित शाळांकडून असे प्रकार घडत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. तसेच पालकांकडूनही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असल्याने दोन वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिला होता.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, अनेक शाळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत फेरपरीक्षा घेतलीच नाही. विद्यार्थ्यांना नववीत फेरपरीक्षेची संधी देण्याऐवजी दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी बहुतांश शाळा नववीत अभ्यासात कच्च्या असणाºया विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. शाळेचा निकाल कमी लागल्यास अथवा विद्यार्थ्यांना कमी टक्के वारी मिळाल्यास नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत आणि त्यांच्याकडून मिळणाºया डोनेशनमुळे शाळांच्या तिजोरीवर परिमाण होत आहे.‘तो’ निर्णय शिक्षण विभागाला सादर करावाविद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात नापास करण्याचे अथवा शाळा बदलण्यासाठी सांगण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, सर्व शाळांनी याविषयीचे नियोजन शिक्षण विभागाला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा