शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड डावा कालवा दुरुस्ती प्रस्तावास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:07 IST

नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ३८ कोटी रुपये मंजूर : एक हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित

नाशिक : गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा ८५ ते १२८.५० कि.मी. मधील दुरुस्ती कामाच्या प्रस्तावास शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, दुरुस्तीसाठी एकूण ३८ कोटी २ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कालवा दुरुस्तीच्या कामामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.नारंगी-सारंगी प्रकल्पाच्या सोबत पालखेड डाव्या कालव्यावरील खरीप कालवाअंतर्गत असलेल्या क्रमांक ४६ ते ५२ वितरिकांना पाणी द्यावयाचे झाल्यास कालव्याच्या ११० किमीला कमीत कमी २२९ क्यूसेक इतकी पाण्याची आवश्यकता असते. सद्य:स्थितीत आवर्तन कालावधीत ११० किमीला फक्त १२० क्यूसेकइतकीच कालव्याची वहनक्षमता असून, त्यामुळे ४६ ते ५२ वितरिकांचे सिंचन चालू असताना नारंगी प्रकल्पात १२८ किमीला पाणी देणे शक्य होत नाही. नारंगी धरणात पाणी देण्यासाठी जास्तीचा कालावधी लागतो व कालव्याचा वहनव्यय वाढतो. या सर्व बाबींचा विचार करता कालव्यावरील सर्व रब्बी, खरिपाचे सिंचन व तसेच वेळेमध्ये नारंगीला कमी कालावधीत पाणी देता यावे व कालव्याचा वहनव्यय कमी व्हावा यासाठी कालवा नूतनीकरणाची कामे करणे अत्यंत आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर पालखेड डाव्या कालव्याच्या विशेष दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर १००० हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. या कामाकरिता दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी ३८ कोटी २ लाख इतका निधी मंजूर झाल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.वहन क्षमता सुधारण्यासाठी दुरुस्तीसन १९८०-८२ च्या काळात येवला तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार डाव्या कालव्याची लांबी वाढवून तो १२८.५० किमी पर्यंत वाढवण्यात आला. शिवाय वितरिका क्रमांक ४६ ते ५२ याद्वारे खरीप सिंचन करण्यासाठी व तसेच खरीप हंगामात नारंगी-सारंगी धरण भरून देणेसाठी तो तयार करण्यात आला होता. नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्प, ता.वैजापूर जि. औरंगाबाद, या धरणात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून खरीप हंगामात डाव्या तट कालव्याव्दारे २०० दलघफू पाणी सोडण्यात येते. या कालव्याची वहनक्षमता कमी झाल्यामुळे नारंगी-सारंगी धरण भरण्यासाठी सद्य:स्थितीत ५८ दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी व कालव्याची वहनक्षमता सुधारण्याकरिता कालवा दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता वाढून कमीत कमी कालावधीत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी