नायगाव : नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्व विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.अध्यक्ष दिलीप कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस व्यासपीठावर संचालक सुभाष निकम, विजय कोतवाल, विनोद चव्हाण, दिलीप शेवाळे, नामदेव ढिकले, शिवाजी बोऱ्हाडे, भाऊराव पाटील, योगेश पगार, हौशीराम घोटेकर, कल्पना कुऱ्हे, छाया काळे, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक प्रदीप बच्छाव यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन करून सभेपुढे १ ते ११ विषय मांडले. सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्यास मंजुरी दिली. दूध संघाचा निफाड येथील व्यावसायिक गाळा व येवला येथील जमीन विक्री हे दोन विषय त्यात उल्लेखनीय ठरले. (वार्ताहर)
दूध संघाच्या सभेत सर्व विषयांना मंजूरी
By admin | Updated: September 12, 2016 00:42 IST