शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात विविध प्रवर्गातील ३२ हजार शिष्यवृत्ती अर्जांना मंजूरी ; २१ हजार अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:35 IST

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे.  परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित असून महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ अर्ज प्रलंबीत आहेत. त्यामुळे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देसमाज कल्याणचे शिष्यवृत्ती अर्ज पडताळणीसाठी विशेष शिबीर२९ डिसेंबरपासून ३२ हजार शिष्यवृत्ती अर्जांना मंजूरी महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ अर्ज प्रलंबीत

नाशिक : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या विशेष शिबीरांतर्गत सुमारे विविध महाविद्यालयांकडून सादर करण्यात आलेले ३२ हजार अर्जांना मजूरी मिळाली आहे.  परंतु सुमारे २१ हजार अर्ज अजूनही प्रलंबित असून महाविद्यालय स्तरावर जवळपास २५ ते २७ अर्ज प्रलंबीत आहेत. त्यामुळे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. समाज कल्याण विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेपाचशे विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ डिसेंबर २०१८ पासून विशेष शिबीराचे आयोजन केले आहे. महाडीबीटी पोर्टलच्या संथ गतीमुळे विद्यार्थ्यांकडूनच अर्ज प्राप्त होण्यास उशीर झाल्यामुळे महाविद्ययालयांकडून समाज कल्याण विभागाला प्रस्ताव प्राप्त होण्यास विलंब झाला होता. यातील सुमारे २५ ते २७ अर्ज अद्यापही समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेले नाही. परंतु प्राप्त झालेल्या एकूण ४३ ते ४५ हजार अर्जांपैकी समाज कल्याण विभागाने सुमारे ३२ हजार अर्ज मंजूर केले असून उर्वरित अर्जही लवकरच निकाली काढण्यात येतील असा विश्वास समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अर्जांचा वाढता ओघ लक्षात घेऊन समाज कल्याण विभागाने २१ अतिरिक्त कर्मचारी या कामासाठी नेमले असून जिल्ह्यातील महाद्यिलयांनाही मुष्यबळ वाढवून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर वेग वाढलामहाडिहीटी पोर्टलच्या संथ गतीमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास विलंब झाल्याने महाविद्यालांकडूनही या प्रस्तांची पडताळणी आणि मंजूरी देण्यास विलंब झाला होता. तर अनेक महाविद्यालयांचे एकूण प्रस्तावांपैकी केवळ १० ते २० टक्के प्रस्ताव प्रलंबित होते. अशा महाविद्यालांची जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत त्यांना लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर करण्याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.              

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्तीcollegeमहाविद्यालयcollectorजिल्हाधिकारी