शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात दलित वस्तीच्या १२ कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:58 IST

प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक दलित व अनुसूचित जाती, जमातीची संख्या असलेल्या भागात जनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. साधारणत: या कामांमध्ये दलित वस्तीत रस्ते, गटार, पथदीप

ठळक मुद्देमहापालिका उदासीन : कामे होण्याविषयी साशंकता१२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता

नाशिक : राज्य सरकारच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत नाशिक महापालिका हद्दीतील दलित वस्तीसाठी १२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा प्रशासनाने सदरचा निधीही वर्ग केला असला तरी, अद्याप एकाही कामाच्या निविदा न निघाल्याने या कामांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक दलित व अनुसूचित जाती, जमातीची संख्या असलेल्या भागात जनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. साधारणत: या कामांमध्ये दलित वस्तीत रस्ते, गटार, पथदीप, समाजमंदिर, सामाजिक सुविधांची कामे केली जावीत असे अपेक्षित असून, त्या त्या भागाची निकड व नागरिकांची मागणी याचा मेळ घालून कामाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. राज्य सरकारकडून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसाठी दरवर्षी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असताना प्रत्यक्षात, मात्र अशी कामे करण्यास संबंधित स्थानिक संस्थाच उदासीन दिसून येतात. नाशिक महापालिकेसाठी जवळपास १५ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी शासनाची असताना प्रत्यक्षात महापालिकेने फक्त १२ कोटी ७२ लाख रुपयांचे ३५ कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले होते. गेल्या वर्षांपासून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. परंतु महापालिकेने पाठविलेले प्रस्ताव चुकीचे व त्यात तांत्रिक दोष असल्याने प्रशासनाने सदरचे प्रस्ताव दुरुस्तीसाठी पुन्हा परत पाठविले होते. आता मात्र सदरचे प्रस्ताव महापालिकेने फेर सादर केल्याने त्यांना प्रशासकीय मंजुरी गेल्या महिन्यातच देण्यात आली आहे. तथापि, महापालिका प्रशासनाने कामांची सुरुवात करण्याबाबत कोणतेही पावले उचलली नाहीत, उलटपक्षी या कामांसाठी येणाºया खर्चाचा काही वाटा उचलण्याची महापालिकेने तयारी न दर्शवितात या कामांना स्थगिती दिली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक