शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला लागलेली आग आटोक्यात, चौकशी समितीचीही नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 14:49 IST

महापालिकेच्या राजीव गांधी भवन मध्ये शिवसेना कार्यालय येथे पेस्ट कंट्रोलचे काम आज सकाळी दहा वाजता सुरू झाले. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि नगरसेवकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.

ठळक मुद्देमहापालिकेच्या राजीव गांधी भवन मध्ये शिवसेना कार्यालय येथे पेस्ट कंट्रोलचे काम आज सकाळी दहा वाजता सुरू झाले त्यामुळे सर्व कर्मचारी आणि नगरसेवकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता

 नाशिक-  पेस्ट कंट्रोल सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे अचानक नाशिक महापालिकेच्या शिवसेना गटनेता कार्यालयाजवळ लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी धावपळ केल्याने आग वेळीच आटोक्यात आली. दरम्यान या आगीची चौकशी करण्यात येईल त्यासाठी आयुक्तांनी चौकशी समितीही नियुक्त केली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महापालिकेच्या राजीव गांधी भवन मध्ये शिवसेना कार्यालय येथे पेस्ट कंट्रोलचे काम आज सकाळी दहा वाजता सुरू झाले त्यामुळे सर्व कर्मचारी आणि नगरसेवकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास या ठिकाणी काम सुरु असताना इलेक्ट्रिक स्वीच बोर्डाने अचानक पेट घेतला त्यामुळे स्टोअर रूमला आग लागली सोफा पंखे आणि काही दस्तावेज जळून खाक झाले महापालिकेच्या अग्निशामक दलाने आज वेळीच आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुरक्षततेचा भाग म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना राजीव गांधी बाहेर पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व संगणक व अन्य विद्युत साहित्य बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या घटनेनंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच आमदार सुहास कांदे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट दिली राज्यातील सर्व महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या इमारतींचे फायर ऑडिट झाले आहे किंवा नाही यासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग