दहावी, बारावी परीक्षांच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्वीकारणार : कृष्णकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:58+5:302021-03-06T04:14:58+5:30

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय ...

Applications will be accepted till the eve of 10th and 12th exams: Krishnakant Patil | दहावी, बारावी परीक्षांच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्वीकारणार : कृष्णकांत पाटील

दहावी, बारावी परीक्षांच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्ज स्वीकारणार : कृष्णकांत पाटील

Next

नाशिक : कोरोनाच्या संकटात गतवर्षी दहावीच्या परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय होणार, याविषयी निर्माण झालेली साशंकता शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केल्याने संपुष्टात आली आहे. तसेच नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांची तयारीही सुरू केली आहे. या परीक्षांपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी विविध अडचणींमुळे निर्धारित वेळेत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

प्रश्न : कोरोनाच्या संकटात दहावी, बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?

पाटील : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ऑफलाइन परीक्षांचे नियोजन विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केले असून याविषयी विद्यार्थी व पालकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय परीक्षेची तयारी करावी. ताणतणावविरहित परीक्षेसाठी विभागीय मंडळही प्रयत्नशील आहे.

प्रश्न : नाशिक विभागातून किती विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतील, याविषयी विभागीय मंडळाचा अंदाज काय आहे?

पाटील : नाशिक विभागातून दहावीच्या सुमारे ०००० तर बारावीच्या ००० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत विभागीय मंडळाकडून परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

प्रश्न : गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यामागे काय कारण असू शकते?

पाटील : परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थीसंख्येत काही प्रमाणात घट दिसत असली, तरी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत आहे. अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. तर, कोरोनाकाळात अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली असून त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर झाल्याने काही प्रमाणात संख्या घटली आहे. मात्र, ही संख्या फारच कमी आहे.

प्रश्न : परीक्षेच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार आहे का?

पाटील : शासनाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यात विद्यार्थी सुरक्षेसाठी परीक्षा केंद्र वाढविण्याची वेळ आली, तर परीक्षा केंद्रेही वाढविण्यात येतील. विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शा‌ळेमध्ये विद्यार्थी मास्क वापरत असून परीक्षांनाही विद्यार्थी मास्क वापरतील. त्याचप्रमाणे सर्व केंद्रांवर निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी भीतीमुक्त, तणावविरहित आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा यशस्वी करण्याचा विभागीय मंडळाचा निर्धार आहे.

Web Title: Applications will be accepted till the eve of 10th and 12th exams: Krishnakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.