नाशिक : रब्बी हंगाम २०१४-१५ साठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत बागायती तसेच जिरायत गहू, ज्वारी तसेच हरभरा व उन्हाळी भुईमूग व कांदा या समाविष्ट पिकांच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कैलास मोते यांनी केले आहे़ याबाबत मोते यांनी सांगितले, शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार या योजनेअंतर्गत उत्पन्नाच्या १५० टक्क््यांपर्यंत लाभ मिळणार आहे़ शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचा विमा हप्ता बँकेत भरण्याची अंतिम मुदत पेरणीपासून एक महिन्यापर्यंत व अखेरीस ३१ डिसेंबरपर्यंत आहे़, तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०१५ पर्यंत आहे़ या योजनेत सहभाग घेणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यात १० टक्के अनुदान मिळणार आहे़
धान्य पिकांचा कृषी विमा घेण्याचे आवाहन
By admin | Updated: November 16, 2014 01:01 IST