अंदरसुल: अंदरसुल ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्त गाव करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करून यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावात शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी गावात व्यापारी, हॉटेल, किराणा आदी दुकानात ग्रामविकासाधिकारी जनार्धन वाघ यांनी कर्मचाº्यांना सोबत घेऊन दुकानातून पिशव्या जप्त करून सर्व दुकानदारांना शासनाच्या निर्णयाची सूचना देऊन ग्रामपंचायतचे छापील पत्रक वाटले.शिलाई ऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कापडी पिशव्या तयार देण्यात आले.प्लास्टिकमुक्तीसाठी सहकार्यकरावे असे आवाहन सरपंच विनिता सोनवणे यांनी केले आहे.
गाव प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:08 IST