शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी : कृषी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:15 IST

शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये,  आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी किटकनाशके काळजीपूर्वक हाताळावीविषबाधा टाळण्यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकऱ्यांना आवाहन

नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये,  आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. शेतातील वेगवेगळ्या पिकात फवारणी करताना किटकनाशक नाक, त्वचा, तोंडाद्वारे शरीरात गेल्याने विषबाधा होत असल्याच्या घटना नाशिक जिल्ह्यातही  काहीवेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी करतांना शिफारशी प्रमाणे योग्य प्रमाणात किटकनाशकांचा वापर करावा. शिफारस नसतांना दोन व दोन पेक्षा जास्त किटकनाशकांचे मिश्रण करु न फवारणी करण्यात येऊ नये. किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा. शरीरावर जखमा किंवा आजारी असल्यास फवारणी करणे टाळावे. अपघाताने विषबाधेची दुर्घटना घडल्यास तात्काळ प्रथमोचार करावेत व विनाविलंब बाधित रुग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे अशा सुचना कृषी  आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व किटकनाशके विक्रेत्यांनी किटकनाशकांची विक्री करतांना संरक्षीत किट उपलब्ध करुन देणे अनिवार्य असल्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. तसेच अतिरिक्त संरक्षीत किट विक्रीसाठीही उपलब्ध ठेवण्यात यावेत, असे निर्देश कृषी संचालकांतर्फे करण्यात आले आहेत 

मजुरांनाही संरक्षक किट द्याशेतकरी/शेतमालक मजूराकडून फवारणी करुन घेतात. अशावेळी शेतकरी/ शेतमालकाने नैतिक जबाबदारी पाळून फवारणी करणाºया शेतमजूरास संपूर्ण शरीर झाकले जाईल असे सरंक्षण किट्स द्यावे व फवारणी समक्ष करु न घेण्यात यावी. विषबाधेची लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात घेवून जावे. तसेच अशा विषबाधेची माहिती तात्काळ ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी