शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

जुना मोबाइल विद्यार्थ्यांना दान करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:42 AM

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचे असल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी ‘डोनेट अ डिव्हाइस’ या नावाने नागरिकांकडे विनावापर पडून असलेले जुने अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल दान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी तंत्रसेतू नाशिक हेल्पलाइन व विद्यावाहिनी रेडिओ या उपक्रमांचाही बुधवारी शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम : आॅनलाइन शिक्षणाचा शुभारंभ, हेल्पलाइन व रेडिओचाही शुभारंभ

नाशिक : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचे असल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी ‘डोनेट अ डिव्हाइस’ या नावाने नागरिकांकडे विनावापर पडून असलेले जुने अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल दान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी तंत्रसेतू नाशिक हेल्पलाइन व विद्यावाहिनी रेडिओ या उपक्रमांचाही बुधवारी शुभारंभ करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात फिजिकल डिस्टन्सचे पालन करून अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनीही आॅनलाइनद्वारे सहभाग नोंदविला.यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील कोरोनाच्या या संकटकाळात दर्जेदार शिक्षण मिळायला हवे यासाठी समाजातील सर्व घटकांनी ‘डोनेट अ डिव्हाइस’ उपक्रमांतर्गत आपल्याकडील जुने मोबाइल, लॅपटॉप, संगणक, स्मार्ट टीव्ही दान करण्याचे आवाहन केले. ज्या ठिकाणी मोबाइल रेंज उपलब्ध नाही अशा ठिकाणी शिक्षकांमार्फत गटागटाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी, ग्रामीण भागामध्ये स्मार्टफोन व इतर सामग्रीअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. ते त्यांना शक्य व्हावे यासाठी विविध स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी आपल्याकडील विनावापर पडून असलेले जुने मोबाइल व अन्य साहित्य दान करण्याचे आवाहन केले. यावेळी शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी प्रास्ताविक केले.बारा मोबाइल झाले दानया कार्यक्रमातच उपस्थित मान्यवरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बारा मोबाइल विद्यार्थ्यांसाठी दान केले, तर अध्यक्ष, सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी नवीन मोबाइल घेऊन देण्याचे जाहीर केले. यावेळी कन्या शाळेच्या दोन विद्यार्थिनींना आॅनलाइन शिक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल वाटप करण्यात आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducationशिक्षणMobileमोबाइल