नाशिक : पीठ गिरणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते. विशेते: श्वसनाचे आजार जडतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा मोफत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पीठ गिरणी कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या कामगारांना अल्प दरात किंवा विनामूल्य घरकुल योजनेत सामावून घ्यावे, कामगारांना आठवड्यातून एकदा सुटी जाहीर करण्यात यावी, बोनस देण्यात यावा, किमान वेतन मिळावे, पगारी रजा मिळावी, आदि मागण्या पीठ कामगार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
पीठ गिरणी कामगारांच्या सुविधांसाठी निवेदन
By admin | Updated: December 28, 2016 01:34 IST