नाशिक : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३ अन्वये तक्रारीची चौकशी करण्यासाठी दहा किंवा दहापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठित करणे बंधनकारक आहे. या समिती सदस्यत्वासाठी इच्छुकांना आवाहन करण्यात आले आहे.सदर समितीत एक अशासकीय सदस्याचा समावेश असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासनस्तरावर जिल्हानिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
तक्रार समिती सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन
By admin | Updated: November 9, 2015 22:34 IST