सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णीमा उत्सव रद्द प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:41 PM2020-10-26T15:41:19+5:302020-10-26T15:43:09+5:30

वणी : सप्तशृंग गडावर कोजागीरी पौर्णीमा उत्सव रद्द करण्यात आला असुन तृतीय पंथीयांचा छबिना उत्सव व कावडधारक यांनाही गडावर प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नवरात्र उत्सव व संलग्न उत्सव रद्द करण्याचा निर्णयशासनाने घेतलाआहे. त्यास अनुसरुन गडावर न्यास व प्रशासनाने याचे पालन करत नवरात्र उत्सव कोवीड नियमांचे पालन करत साजरा केला. दरम्यान येत्या 30 ला कोजागिरी पौर्णीमा आहे.या दिवशी गडावर कावडधारकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

Appeal to the administration to cancel the Kojagiri Pournima celebration on Saptashring fort | सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णीमा उत्सव रद्द प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन

सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णीमा उत्सव रद्द प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देकोजागिरी पौर्णीमा या दिवशी गडावर कावडधारकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

वणी : सप्तशृंग गडावर कोजागीरी पौर्णीमा उत्सव रद्द करण्यात आला असुन तृतीय पंथीयांचा छबिना उत्सव व कावडधारक यांनाही गडावर प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नवरात्र उत्सव व संलग्न उत्सव रद्द करण्याचा निर्णयशासनाने घेतलाआहे. त्यास अनुसरुन गडावर न्यास व प्रशासनाने याचे पालन करत नवरात्र उत्सव कोवीड नियमांचे पालन करत साजरा केला. दरम्यान येत्या 30 ला कोजागिरी पौर्णीमा आहे.या दिवशी गडावर कावडधारकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

नांदुरी , चंडीकापुर व वणी चौफुली या ठिकाणी वाहनामधे टिप ठेवुन कावडधारकांनी वेगवेगळ्या नद्यांमधुन आणलेले तीर्थ संकलीत करुन टिपमधे साठवुन गडावर नेण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली सायंकाळी आरतीनंतर तीर्थाभिषेक , महापुजा व रात्री 12 वाजता आरती असे नियोजन आखण्यात आले आहे.

तसेच गडावर तृतीय पंथीयांचा छबिना सोहळा कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. या दरम्यान गडावर मंदीरात पुजारी यांच्या व्यतीरीक्त इतरांना प्रवेश बंदी करण्यातआली आहे. कोवीड नियमांचे पालन करत नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला त्यापाठोपाठ येणार्या कोजागीरी पौर्णिमा उत्सवासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन न्यासाचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख तहसीलदार बि ए कापसे , ललीत निकम ,  दिपक पाटोदकर, मंजोत पाटील, प्रशांत देवरे, भुषणराज तळेकर यांनी केले आहे.

शांतीपाठाने कोजागीरी उत्सवाची सांगता करण्यात येणार असुन नियोजीत तारखेस प्रसाद स्वरुपात दुधाचे वाटप गडवासियांना नियमांचे पालन करणार असल्याची माहीती मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे व्यवस्थापक भगवान नेरकर यांनी दिली.

Web Title: Appeal to the administration to cancel the Kojagiri Pournima celebration on Saptashring fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.