शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

अपार्टमेंटमध्ये दुर्मीळ ‘पहाडी तस्कर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:27 IST

येथील पाथर्डी फाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला.

नाशिक : येथील पाथर्डी फाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला.  घरातील रहिवाशांनी जेव्हा बाहेरील बल्ब सुरू केला तेव्हा गाडीच्या चाकाजवळ साप बसलेला असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्या सापाला कुठल्याही प्रकारे असुरक्षितता निर्माण होईल, असे कृत्य न करता सावधगिरीने प्रसंगावधान राखत सर्पमित्र संस्थेशी संपर्क साधला. दरम्यान, काही वेळातच सर्पमित्र त्या ठिकाणी पोहचले व त्यांनी सुरक्षितरीत्या सापाला रेस्क्यू केले. यावेळी सदर साप हा पहाडी तस्कर जातीचा असल्याचे लक्षात आले. हा साप फारसा आढळून येत नाही.  यामधील तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामीण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो. सध्या बदलत्या वातावरणामुळे जमिनीखाली उष्णता अधिक वाढत असल्याने सर्प बिळांमधून बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या महिनाभरात सुमारे ४७ पेक्षा अधिक सर्प रहिवासी भागातून ‘रेस्क्यू’ करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची नोंद आहे. नागरिकांनी या हंगामात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.