शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

इगतपुरी वगळता सर्वत्र गोडसेंचाच बोलबोला मताधिक्य : पश्चिममध्ये ५६ हजार, सिन्नरमध्ये ४१ हजारांची आघाडी

By admin | Updated: May 17, 2014 00:18 IST

नाशिक : सिन्नरला गोडसेंना मताधिक्य मिळणार, परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये मतदारांचा कौल छगन भुजबळ यांनाच मिळेल, असे अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. प्रत्यक्षात इगतपुरीत भुजबळ यांनी गोडसे यांच्यावर अवघ्या दीड हजार मतांची आघाडी घेतली. अन्य विधानसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांचाच बोलबाला राहिला. मध्य नाशिकच्या मताधिक्यावर भुजबळ यांना भरवसा होता. परंतु तेथेही गोडसे हेच आघाडीवर राहिले. गोडसे यांना पश्चिम नाशिकने सर्वाधिक ५६ हजार ७५८ मतांची विक्रमी आघाडी दिली.

नाशिक : सिन्नरला गोडसेंना मताधिक्य मिळणार, परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये मतदारांचा कौल छगन भुजबळ यांनाच मिळेल, असे अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. प्रत्यक्षात इगतपुरीत भुजबळ यांनी गोडसे यांच्यावर अवघ्या दीड हजार मतांची आघाडी घेतली. अन्य विधानसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांचाच बोलबाला राहिला. मध्य नाशिकच्या मताधिक्यावर भुजबळ यांना भरवसा होता. परंतु तेथेही गोडसे हेच आघाडीवर राहिले. गोडसे यांना पश्चिम नाशिकने सर्वाधिक ५६ हजार ७५८ मतांची विक्रमी आघाडी दिली.नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात अटीतटीची लढत मानली जात होती. त्यामुळे मतदानानंतर आडाखे बांधताना उमेदवारांना कुठे आघाडी मिळेल आणि कोठे पिछाडी मिळेल, याविषयी दावे केले जात होते. देवळाली आणि सिन्नर मतदारसंघात गोडसे यांना मताधिक्य मिळेल. परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये ही उणीव भुजबळ भरून काढतील, अशी गणिते मांडली जात होती. पूर्व नाशिक म्हणजेच पंचवटीमध्येही भुजबळ हेच आघाडीवर राहातील, असे सांगितले जात होते. परंतु मतदान यंत्रांनी भुजबळ यांच्या बाबतीत सारेच दावे फोल ठरविले. इगतपुरी मतदारसंघात भुजबळ यांचा भ्रमनिरास झाला. त्यांना ६० हजार ७४२ मते मिळाली, तर हेमंत गोडसे यांना ५८ हजार ९९९ मते मिळाली. त्यामुळे भुजबळ यांना केवळ एक हजार ७४३ मताधिक्य राहिले. मध्य नाशिकमध्ये तर जुन्या नाशिकसह अन्य भागांवर भुजबळ यांची मदार होती. परंतु या मतदारसंघातही गोडसे हेच आघाडीवर राहिले. या मतदारसंघात गोडसे यांना ७२ हजार ६२३ मते मिळाली, तर भुजबळ यांना ५७ हजार ४२० मते मिळाली. म्हणजे गोडसे यांनाच १५ हजार २०३ मतांचे मताधिक्य मिळाले. सिन्नरमध्ये गोडसे हेच आघाडीवर असतील अशी अटकळ होती. ते खरे झाले. सिन्नर मतदारसंघात गोडसे यांना ९४ हजार ९१३ मते मिळाली तर भुजबळ यांना ५३ हजार १४८ मते मिळाली. म्हणजेच ४१ हजार ७६५ मतांची आघाडी गोडसे यांना मिळाली.विधानसभा मतदारसंघनिहाय गोडसे यांचे मताधिक्यनाशिक पूर्व- ४२ हजार ४२०, नाशिक पश्चिम- ५६ हजार ७५८, नाशिक मध्य- १५ हजार २०३, सिन्नर- ४१ हजार ७६५, देवळाली- ३२ हजार २७६.