शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

निवडणूक प्रक्रि येविरु द्ध न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:24 IST

तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी तयार केलेल्या मतदार याद्या सदोष असण्याबरोबरच प्रत्येक मतदाराला पंधरा गणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

सटाणा : तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी तयार केलेल्या मतदार याद्या सदोष असण्याबरोबरच प्रत्येक मतदाराला पंधरा गणांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रथमच शेतकरी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या आदेशान्वये जिल्हाधिकाºयांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या सदोष आहेत. तसेच मतदार याद्या तयार नसताना गणरचना जाहीर करता येते का? व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पंधरा गणांमधील प्रत्येक मतदाराला पंधराच्या पंधरा उमेदवारांना मतदानाचा हक्क मिळावा या मुद्द्यांवर चर्चा करून दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी माजी आमदार संजय चव्हाण, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, यशवंत अहिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात इच्छुकांची बैठक आयोजित केली होती.खर्च कोण करणार?निवडणूक प्रक्रि येविरु द्ध न्यायालयात जाण्यासाठी आर्थिक खर्च कोण करणार, असा सवाल बैठकीत उपस्थित झाला. यावेळी शैलेश सूर्यवंशी यांनी प्रत्येकी पाच हजार रु पये जमा करावेत, अशी सूचना मांडली. त्याला समको बँकेचे माजी अध्यक्ष शरद सोनवणे यांनी तत्काळ पाच हजार रु पये जमा करून सकारात्मक प्रतिसाद दिला असता, दुसरीकडे मात्र पॅनलचे नेते होऊ पाहणाºया काही मंडळीने अर्थकारण पुढे येत असल्याचे पाहून चक्क बैठकीतूनच काढता पाय घेतला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक