शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शहर बससेवा कशीही, कुणीही चालविली तरी बोजा नाशिककरांवरच पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:03 IST

क्रिसीलचा प्रारुप अहवाल सादर : तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांक शुल्क, इंधनसेस वाढीची शिफारस

ठळक मुद्देबससेवा सुरू करताना तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांक शुल्क, इंधनसेस यासह मोटार व्हेईकल टॅक्समध्ये वाढ करण्याची शिफारसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौ-यात महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी, त्यासाठी शासनाकडून सहकार्याची तयारी दर्शविली होती

नाशिक - शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा प्रारूप शक्यता अहवाल क्रिसील या संस्थेने महापालिका आयुक्तांना सादर केला. अहवालानुसार, बससेवा कुणीही, कशीही चालविली तरी त्याचा काही प्रमाणात आर्थिक भार विविध कररुपाने नाशिककरांवरच पडणार आहे. बससेवा सुरू करताना तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांक शुल्क, इंधनसेस यासह मोटार व्हेईकल टॅक्समध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. दरम्यान, बससेवेबाबतचा अंतिम अहवाल येत्या ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याची सूचना आयुक्तांनी क्रिसीलला केली असून त्यानंतर तो महासभेवर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.शहर बससेवा हस्तांतरीत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नाशिक महापालिकेकडे लकडा लावला आहे. तूट कमी करण्यासाठी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत काही मार्गावरील बसफे-याही कमी केल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौ-यात महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी, त्यासाठी शासनाकडून सहकार्याची तयारी दर्शविली होती. महापालिकेने बससेवेबाबतचा शक्यता अहवाल तयार करण्यासाठी क्रिसील या संस्थेची नेमणूक केली होती. क्रिसीलला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, क्रिसीलने प्रारूप अहवाल आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सादर केला आहे. क्रिसीलने बससेवेबाबत तीन पर्याय सुचविले आहेत. त्यात, महापालिकेने परिवहन समिती स्थापन करून स्वत: चालवावी अथवा कंपनी स्थापन करावी अथवा पीपीपी तत्वावर सेवा चालवावी, या पर्यायांचा समावेश आहे. तिन पर्यायांपैकी कुठलाही पर्याय निवडला तरी, पहिल्या वर्षी २४ कोटी रुपये तूट भरून काढण्यासाठी महापालिकेवर आर्थिक भार येणारच आहे. त्यात, क्रिसीलने तूट भरून काढण्यासाठी विकास शुल्क, मुद्रांक शुल्क, मोटर व्हेईकल टॅक्स, इंधनावर सेस लावण्याची शिफारस केलेली आहे. बससेवा कशीही चालविली तरी डेपो आणि टर्मिनस यांचा खर्चही मनपाला आपल्या तिजोरीतून सोसावा लागणार आहे. मात्र, महामंडळाचे टर्मिनल भाडेतत्वावर घेता येऊ शकते, अशीही सूचना करण्यात आली आहे. बससेवा चालविण्यासाठी ११६ कोटी रुपये भांडवली खर्च अपेक्षित धरला असून आॅपरेशन व मेंटेनन्ससाठी वार्षिक ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. प्रामुख्याने तिकिट विक्रीपासून पहिल्या वर्षी ४६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे २४ कोटींची तूट भरून काढण्यासाठी मनपा असो अथवा कंपनी यांना विविध करांच्या माध्यमातून पैसा उभा करावा लागणार आहे. त्यामुळे, बससेवा कशीही-कोणीही चालविली तरी, काही प्रमाणात महापालिकेवर आर्थिक भार अटळ आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी येणा-या एकूण खर्चाचा तपशिल आयुक्तांनी मागविला असून भारतात ज्या शहरात बससेवा सुरू आहेत, त्यांचा अभ्यास करून अंतिम अहवाल ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिले आहेत.पीपीपीमधील दोन पर्यायपब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचाही पर्याय सुचविण्यात आला असून त्यातही नेट कॉस्ट आणि ग्रॉस कॉस्ट या दोन पर्यायांची चर्चा करण्यात आलेली आहे. नेट कॉस्टनुसार, एखादी एजन्सी नेमून सर्व बससेवा त्यांनी चालवायची. केवळ तिकिटाचे दर ठरविण्याचे अधिकार मनपा किंवा कंपनीला राहतील. ग्रॉस कॉस्टनुसार, एजन्सीला फक्त बससेवा चालवायला द्यायची. तिकिट विक्रीच्या माध्यमातून महापालिकेने महसूल जमा करायचा. त्यासाठी लागणारे मनुष्यबळाचे आऊटसोर्सिंग करायचे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका