शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:52 IST

शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड येथे राहणाऱ्या एका पोलीस अधिकाºयाचा सकाळी मृत्यू झाला. तर काल रात्री झालेल्या एका पोलिसाचा आणि टाकळीरोड येथील आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याने चोवीस तासात कोरोनामुळेच तीन जणंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नाशिक शहरात उपचार घेताना मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.

ठळक मुद्देशहरातील बळींची संख्या आठ : कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १२८ वर

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात मंगळवारी (दि.२६) आणखी बारा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या १२८ झाली आहे. याशिवाय मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या आणि शहरातील कॉलेजरोड येथे राहणाऱ्या एका पोलीस अधिकाºयाचा सकाळी मृत्यू झाला. तर काल रात्री झालेल्या एका पोलिसाचा आणि टाकळीरोड येथील आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्याने चोवीस तासात कोरोनामुळेच तीन जणंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे नाशिक शहरात उपचार घेताना मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.मालेगाव येथील एका पोलीस अधिकाºयास त्रास होऊ लागल्याने त्याला २१ मे रोजी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांच्या घसा स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आणि उपचारही सुरू करण्यात आले. दरम्यान, २४ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्यावर आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे सोमवारी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि मंगळवारी दुपारी निधन झाले. कॉलेजरोडवर वास्तव्यास असलेल्या या पोलीस कर्मचाºयाच्या कुटुंबातील चौघे जण अगोदरच पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी व रात्री आणखी बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सायंकाळी शहरातील एकूण १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सात रुग्ण हे आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील पॉझिटिव्ह आहेत तर, तीन रुग्ण नवीन आढळले आहेत. जुुन्या रुग्णांपैकी जेलरोडवरील चंपानगरीतील रुग्णाच्या संपर्कातील ३८ वर्षीय व २० वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांच्याच संपर्कातील जेलरोडवरील कॅनॉल रोडवरील ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. क्रांतीनगर येथील हमाली काम करणाºया रुग्णाच्या संपर्कातील एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आगर टाकळी येथील बाधिताच्या संपर्कातील परंतु हनुमानवाडी येथे राहणाºया २७ वर्षीय युवकाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.पॉझिटिव्ह संपर्कातील व्यक्ती अधिकपंचवटीतील महालक्ष्मी चित्रपटगृहाजवळ रविवारी (दि.२४) आढळलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर पंडितनगर येथेही अगोदरच्या बाधितामुळे एका ६५ वर्षीय वृध्देला संसर्ग झाला आहे. पखालरोड येथील ७३ वर्षीय बाधिताच्या संपर्कातील युवक तर वडाळागाव येथेही एका रुग्णाच्या संपर्कात असलेल्या ५९ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जत्रा हॉटेलजवळील श्रीरामनगर येथेदेखील एका बाधितामुळे अन्य ६४ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर पोलीस मुख्यालयातदेखील एका कर्मचाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू