शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
5
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
6
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
7
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
8
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
9
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
10
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
11
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
12
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
13
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
14
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
15
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
16
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
17
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
18
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
19
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
20
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...

उत्तरपत्रिका कचऱ्यात

By admin | Updated: December 7, 2015 00:01 IST

धक्कादायक के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजमधील प्रकार

नाशिक : विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी विद्यापीठाकडे न पाठविता कचऱ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर, इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात समोर आला. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा पेपर कचऱ्यात आढळला तो विद्यार्थी परीक्षेस हजर असल्याचे दाखविल्याने हा संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीतर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या अ‍ॅग्रीकल्चरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पार पडल्या. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी विद्यापीठाकडे न पाठविता कचऱ्यात फेकून दिल्याचे काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र प्रशासनाने समाधानकारक उत्तर न देता, त्यांच्याकडून पेपर मिळविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्या विद्यार्थ्यांना दमदाटीदेखील केली. परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला भीक न घालता हा संपूर्ण प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती हस्तगत करण्यासाठी विद्यापीठाकडे माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल केला आहे.