शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘पकोडे’ आंदोलनाला रोजगार निर्मितीतून उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 14:31 IST

आजवर राज्य शासनाकडून दरवर्षी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधांसाठीच कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चासाठी संबंधित विभागाकडून अगोदर योजनानिहाय व लाभार्थीनिहाय निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून त्याचा आराखडा तयार करावा लागतो व

ठळक मुद्देसरकारचा उतारा : ‘पकोडा’ आंदोलनाला प्रत्युत्तरविकास निधीतून रोजगार निर्मिती साधण्याचा निर्णय

नाशिक : देशपातळीवर बेरोजगारांच्या वाढत्या संख्येने राजकीय वातावरण ढवळून निघून निवडणूक प्रचाराचा तो महत्त्वाचा मुद्दा ठरल्याने देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी बेरोजगारी कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विरोधकांनीदेखील याच प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ‘पकोडा’ आंदोलन हाती घेतल्यामुळे हादरलेल्या राज्य सरकारने आता जिल्ह्यांना दरवर्षी विकासकामांसाठी दिल्या जाणा-या विकास निधीतून रोजगार निर्मिती साधण्याचा निर्णय घेतला आहे.आजवर राज्य शासनाकडून दरवर्षी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सोयीसुविधांसाठीच कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या खर्चासाठी संबंधित विभागाकडून अगोदर योजनानिहाय व लाभार्थीनिहाय निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून त्याचा आराखडा तयार करावा लागतो व त्याचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर शासनाकडून निधी वितरित केला जातो. सरकारने दिलेल्या या निधीत कपात वा वाढ करण्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकारला असून, अधिका-यांनी आराखड्यानुसार विकास निधी पूर्णत: खर्च करणे बंधनकारक करण्यात येते, त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधितांना समजही दिली जाते. सर्वसाधारणपणे जिल्हा विकास निधीच्या विनियोगाची हीच पद्धत आहे. परंतु आता राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा विकास निधी रोजगार निर्मिती क्षेत्रासाठी वापरण्याचे आवाहन सर्व जिल्हाधिका-यांना केले आहे. नाशिक येथे सोमवारी झालेल्या राज्यस्तरीय जिल्हा नियोजन विकास बैठकीत त्यांनी तसे जाहीरच केले आहे. या कामासाठी निधी कमी पडल्यास वाढीव मागणी अधिका-यांनी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.देशात व राज्यात सर्वत्र बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. विरोधकांच्या मते बेरोजगारी कमी होण्याऐवजी नोटाबंदी व जीएसटीनंतर बेरोजगारीत वाढ झाल्याने सरकार नोक-या देण्यास अपयशी ठरल्याचे आरोप केले जात आहेत. त्यावर सरकारकडूनही प्रत्युत्तर दिले जात असून, त्यातूनच ‘पकोडे’ विक्रीदेखील एकप्रकारे रोजगार निर्मिती असल्याचे समर्थन सरकारकडून केले जात असल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी देशात ठिकठिकाणी ‘पकोडे’ आंदोलन सुरू केले आहे.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक