शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून दुसऱ्या कैद्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:48 IST

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने हातातील बेडीने दुसºया कैद्याच्या डोक्यावर मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने हातातील बेडीने दुसºया कैद्याच्या डोक्यावर मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारागृहात रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मनोरूग्ण कैदी सचिन कन्हैय्या चावरे (रा. गोरेवाडी नाशिकरोड) हा बॅरेक क्रमांक तीनजवळील स्वच्छतागृहात शौचास गेला होता. चावरे याच्या हातात हातकडी होती. यावेळी कैदी शशिकांत ऊर्फ पप्पू शिवानंद झुरळे (रा. अंदुर, ता. तुळजापूर) हा स्वच्छतागृहाकडून पाण्याची बाटली घेऊन जात असताना यावेळी सचिन चावरे याने शशिकांत यास बोलावून घेत मदत करण्यास सांगितले.शशिकांत हा खाली वाकला असता सचिनने शशिकांतच्या डोक्यावर हातातील हातकडीने डोक्यात मारल्याने डोके फुटून रक्तस्त्राव होऊ लागला. घडलेली घटना बघून आजूबाजूच्या कैद्यांनी जखमी शशिकांत याला त्वरित कारागृहातील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. तेथून शशिकांतला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यापूर्वीदेखील कैदी चावरे याने काही कैद्यांसह अधिकाºयांवरदेखील हल्ले केले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर बालुसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कैदी चावरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवकाचा मृत्यूलोहशिंगवे येथील भाऊसाहेब जुंद्रे यांच्या मळ्यात राहणारा युवक शांताराम दगडू भले याला शनिवारी रात्री उलट्या होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. शांताराम भले यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी